राष्ट्रीय

संसदीय मैत्री गटात खासदार बळवंत वानखडे यांची मोरोक्को दौऱ्यासाठी निवड 

अमरावती : लोकसभा अध्यक्षांनी भारताची जागतिक पातळीवरील उपस्थिती अधिक प्रभावी करण्यासाठी ‘संसदीय मैत्री गट’ (Parliamentary Friendship Groups) स्थापन केला आहे. या गटाच्या माध्यमातून विविध देशांमध्ये दौरे करून भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘संसदीय मुत्सद्देगिरी’ला (Parliamentary Diplomacy) जागतिक स्तरावर बळकटी देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या दौऱ्यादरम्यान भारत आणि मोरोक्को यांच्यातील राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि संसदीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा होणार आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाला संसदीय पातळीवर अधिक गती मिळेल, तसेच महाराष्ट्रातील जनतेचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यास मदत होईल.
या दौऱ्यामुळे भारत-मोरोक्को संबंधांना नवी दिशा मिळेल.

What's your reaction?