महाराष्ट्र

सौ.आरती राजेश वानखडे यांची तातडीने घटनास्थळी धाव मृताच्या वारसांना शासकीय सेवेत घेण्याची केली ठाम मागणी

मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मागणीच्या अनुषंगाने तातडीने कंत्राटी तत्वावर तत्काळ रुजू करून घेण्यात प्रशासनाची सहमती

मोर्शी तालुक्यातील मौजा भांबोरा येथे गुरुवारी सकाळी वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, चरणदास वासुदेव इखे (वय ५५) हे सकाळी आपल्या शेतात शेतीची कामे करीत होते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान त्यांची पत्नी व मुलासह शेतात कामासाठी गेले होते जेवण करायचा वेळ झाल्यामुळे इखे यांच्या पत्नीने मुलाला वडिलांला बोलायला पाठवले मुलगा वडिलांना शोधत असता शेतात रक्त सांडललेले दिसले मुलाने आईला सांगिले असता शोधत पत्नी गावात परत आली आणि गावातील काही नागरिकांना घेऊन पुन्हा शेतात गेली. शोध घेत असताना शेतालगतच्या जंगलाच्या दिशेने चरणदास इखे यांना फरपटत नेल्याच्या खुणा आढळल्या. पुढे जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघांने त्यांच्या नरडीवर हल्ला केल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे सह आरती राजेश वानखडे तहसीलदार सागर ढवळे तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या परिसरात वाघाच्या पावलांचे ठसेही आढळले आहेत. या घटनेनंतर भांबोरा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आरती राजेश वानखडे यांचे सह ग्रामस्थांनी केली. मृतदेहाचा पंचनामा सुरू असून पुढील तपास वन विभाग व मोर्शी पोलीस करीत आहेत.

यावेळी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत नियमाप्रमाणे देण्यात येत असल्याचे वनविभागाद्वारे सांगण्यात आले. परंतु यावेळी मृताचे वारस व आरती राजेश वानखडे यांनी आर्थिक मदती ऐवजी मृताच्या वारसाला शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी घेण्याची ठाम मागणी केली. याबाबत आरती राजेश वानखडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे स्विय सहाय्यक तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून वारसांच्या मागणी विषय अवगत केले. यावर प्रशासनांद्वारे वनविभाग शासन स्तरावर मृताच्या वारसाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत कारवाई करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे तातडीने मृताच्या वारसाला वनविभाग अंतर्गत कंत्राटी तत्वावर नेमणूक देणार असल्याचे सुद्धा नमूद केले. त्याला नोकरीत कायमस्वरूपी निश्चित करण्यात येईल याबाबत आर्थी राजेश वानखडे यांनी ठामपणे मृतांच्या कुटुंबीयांना हमी देऊन या दुर्दैवी घटनेत बद्दल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी सौ.आरती राजेश वानखडे सह तहसीलदार सागर ढवळे, प्रदिपभाऊ गौरखेडे, DFO सुमित कुमार, RFO प्रशांत भुजाडे, मोर्शी पोलीस ठाणेदार आठवले, तालुकाध्यक्ष विकास तट्टे, सचिन कोकाटे, नितेश जाने, गौरव मडघे, सागर माहोरे, अजय वरघट, योगेश बहुरूपी, संकेत कडू,

What's your reaction?