बाभुळखेडा, पोस्ट आमनेर, ता. वरुड, जि. अमरावती : आर्थिक फसवणूक, मारहाण आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून हर्षल गोपालराव जिचकार यांनी दि. २६ रोजी आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी थुगाव देव (ता. नरखेड) येथील नीतू हनुमंत पांगुळ आणि तिचा भाऊ शिवम हनुमंत पांगुळ यांच्यावर कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.
जिचकार कुटुंबीयांच्या आरोपानुसार, प्रेमसंबंधातून झालेला विश्वासघात, आर्थिक पिळवणूक तसेच धमक्या आणि मारहाणीमुळे हर्षल जिचकार हे मागील काही काळापासून मानसिक तणावाखाली होते. संबंधितांकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

या त्रासाला कंटाळून हर्षल यांनी दि. २६ रोजी टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपविले, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नीतू पांगुळ आणि शिवम पांगुळ यांच्यावर BNS कलम १०८ अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिचकार कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.




















