अमरावती, ९ नोव्हेंबर –अमरावती जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार अरविंद सावंत यांनी केले.
आज (रविवार) सकाळी ११ वाजता अमरावती येथे हॉटेलमध्ये झालेल्या नगरपरिषद-नगरपंचायत न्याय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडघे यांनी केले होते.
या बैठकीला खासदार अरविंद सावंत यांच्या समवेत शिवसेना उपनेते नितीन बापू देशमुख, आमदार गजानन लवटे, माजी खासदार अनंतराव गूढे, संपर्कप्रमुख प्रतिभाताई बोपशेट्टी, जिल्हाप्रमुख ज्योतीताई अवघड, महिला आघाडी प्रमुख असावरीताई देशमुख, तसेच सुधीर सूर्यवंशी, अभिजीत ढेपे, प्रदीप वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीला उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, युवा सेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रचंड संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहून हॉटेल परिसर गजबजून गेला होता.




















