अमरावती

विलास नगर स्मशानभूमी विकासाचा सुवर्णकाळ सुरु झाला आहे-आ.सौ. सुलभाताई खोडके

अंत्यविधी सुविधा व सौंदर्यीकरणाच्या कामांनी विलास नगर स्मशानभूमीचा कायापालट

अंत्यविधीसाठीच्या सर्व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याने मोठ्या स्मशानभूमीवरील भार कमी होईल-आ.सौ. सुलभाताई खोडके

अमरावती ( प्रतिनिधी ) दिनांक -०९ नोव्हेंबर :- वर्ष १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या विलास नगर हिंदू स्मशानभूमी (मोक्षधाम ) येथे मरणोत्तर विधी व अंत्यसंस्कारासाठी चांगली सुविधा नसल्याने शहरवासीयांना गडगडेश्वर येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार व विधीसाठी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.शहरात लोकवस्ती झपाट्याने वाढत असल्याने अंत्यसंस्काराला घेऊन सुद्धा मोठ्या स्मशानावर प्रचंड ताण व भार पडत होता. परंतु कोरोना -कोविड काळ आला आणि विलास नगर स्मशानभूमीचे महत्व अधोरेखित झाले. त्यामुळे त्याठिकाणी मरणोत्तर अंत्यविधीक्रिया साठी चांगली सुविधा उपलब्ध करण्याबाबत मनपा प्रशासन व संस्थानच्या वतीने पुढाकार घेण्यात आल्याने स्मशानभूमीचे चित्र पालटले आहे. विलास नगर स्मशानभूमीच्या विकासाचा सुवर्णकाळ सुरु झाला असून आवश्यक सुविधा, सुरक्षा व सौंदर्यीकरणासाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार असल्याचा विश्वास अमरावतीच्या आमदार- सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला.

अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील विलास नगर हिंदू स्मशानभूमी येथे संस्थानच्या वतीने निर्माण केलेल्या सुविधांचे उदघाटन तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधीतून पेव्हिंगब्लॉक बसविणे व काँक्रिटीकरण कामांचे भूमिपूजन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य -आ.संजय खोडके, विलास नगर हिंदू स्मशानभूमी संस्थानचे अध्यक्ष- अशोकजी बसेरिया, विश्वस्त किशोर कारिया, सचिव रामेश्वर जयस्वाल, माजी नगरसेवक -पुरुषोत्तम बजाज, डॉ. इंद्रलाल गेमनानी, सुरज मोहनलाल साहू चावलवाले, डॉ अटल तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आमदार महोदयांनी फीत कापून व नामफलकाचे अनावरण करून कार्यक्रमाची औपचारिकता साधली.

पुढे बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या कि, मृत्य हे जीवनाचे अंतिम सत्य असून स्मशानभूमी पर्यंत माणसाचा अंतिम प्रवास असतो. म्हणून दुःखात असलेल्या शोकाकुल लोकांना स्मशानभूमीत जर चांगले प्रसन्न वातावरण दिसले तर त्यांचे दुःख थोडे कमी होते. म्हणून स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीच्या चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी दानदाते सुद्धा समोर आल्याने निश्चितच हा प्रयत्न समाजाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारा ठरणार असल्याचे मनोगत सुद्धा आ.सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सतीश करेसिया, दीपक साहू , सतीश उर्फ गोलू बसेरिया, सुरज मोहनलाल साहू चावलवाले, उदय साहू , रितेश साहू , कैलास चावलवाला , दिलीप साहू, अरुणजी पटेरीया, माजी नगरसेवक- श्रीचंद तेजवानी , मनीष बजाज, संजय वानरे, माजी नगरसेवक -भूषण बनसोड , प्रवीण भोरे, रविकांत गवई, दिनेश बोस , दिलीप हरदे, बाबा साहू, संजय पटेल, रामचंद गुप्ता , सुरेश गुप्ता उर्फ मुन्ना, मोहन गुप्ता , शरद जवंजाळ, प्रथमेश गवई, विशाल गुप्ता,हरीश बजाज , राजेश विश्वकर्मा , महेश साहू , संजय साहू , दीपक साहू, प्रताप सोमनानी, कैलास साहू, राहुल साहू , संकेत बसेरिया , नंदू काळे,अशोक इसळ, नंदू काळे , अविनाश पारडे , स्मित माथुरकर ,शिवकुमार साहू, प्रकाश तिवारी, नरेंद्र वानखडे , भास्कर ढेवले, विनोद गुडधे, दिनेश देशमुख, योगेश सवाई,प्रशांत पेठे, निलेश वडे, सुधीर ठाणेकर, नरेंद्र वानखडे , राजू पुसतकर, शंकर काळे, राजेश कोठारे , श्रवण भोरे, यश चोपडे, बबलू जामनिक,भूषण इंगळे, अविनाश बोबडे, संजय भोवते, राहुल तायडे, आदींसह विलास नगर , मसानगंज, रमाबाई आंबेडकर नगर , कपिलवस्तू नगर येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

स्मशानभूमीतील सुविधांचा प्रचार -प्रसार व्हावा- आ. संजय खोडके

आपल्या मनोगतात आ.संजय खोडके यांनी सांगितले कि, विलास नगर हिंदू स्मशानभूमीचा परिसर अतिशय विस्तीर्ण असल्याने व त्या ठिकाणी जागा उपलब्ध असल्याने मरणोत्तर अंत्यविधीक्रियासाठी लागणाऱ्या सर्वच सुविधा निर्माण करता येऊ शकतात. सद्या शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने मरणोत्तर विधीक्रियांसाठी विलास नगर स्मशानभूमीचा वापर करणे एक चांगला पर्याय ठरत आहे. अंत्यविधीसाठी आवश्यक सर्व सुविधा या स्मशानभूमीत उपलब्ध झाल्याने संस्थानने त्याचा प्रचार-प्रसारावर जोर द्यावा, पार्किंग, सुरक्षा, वृक्षारोपण, आदींबाबत सुद्धा चांगल्या उपायोजना केल्यास निश्चितच स्मशानभूमीत शोकमय असलेल्या नागरिकांना सुखद व प्रसन्न वातावरणाची अनुभूती झाल्यास त्यांचे दुःख कमी होईल. असे आ.संजय खोडके यांनी सांगितले.

स्मशानभूमीच्या विकासाठी दानदाते पुढे आले- विश्वस्त अशोक बसेरिया
विलास नगर हिंदू स्म्शानभूमी संस्थानचे अध्यक्ष अशोक बसेरिया यांनी सांगितले कि, स्मशानभूमी मध्ये दाहसंस्कार ओटे व शेड, लाकडे, पाण्याची व्यवस्था, प्रसाधन गृह व स्नानगृह, दशक्रिया व तिसरा दिवस विधिक्रिया, शववाहिनी व शवपेटी अश्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. लवकरच प्रवेशद्वार ,अंतेष्टीचे सामान व गॅसशवदाहिनी तसेच दफनभूमीसाठी चांगली सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थानचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान विलास नगर स्मशानभूमीच्या विकासासाठी दान देणारे दानदाते सुरज मोहनलाल साहू चावलंवाले, दीपक शालिग्राम साहू, देविदास नारायणदास साहू, अनिल ठाकूरदास बमनानी, दिलीप नंदकिशोर साहू टोले, गिरिधारीलाल साहू, यांचा आमदार महोदयांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

What's your reaction?