अमरावती

स्वच्छता, सुविधा व सौंदर्यीकरण या विकासाच्या त्रिसूत्रीचा शेगांव प्रभागात प्रभावी अंमल-आ.सौ.सुलभाताई खोडके

आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते कॉटन ग्रीन कॉलनी, प्रभू नगर , शेगांव गावठाण येथील विकासाचा कार्यारंभ

विकास पर्वात शेगांव प्रभागाला पुरेपूर लाभ देण्यासाठी कटिबद्ध – आ.सौ.सुलभाताई खोडके

अमरावती(प्रतिनिधी)दिनांक- १५ नोव्हेंबर :- विकासाच्या संकल्पनेत जितक्या पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत . तितक्याच सार्वजनिक स्वच्छतेच्या सोयी निर्माण करणे देखील महत्वाचे आहे. सोबतच सौंदर्यीकरणाने परिसराला नवे स्वरूप निर्माण करून स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावणे सुद्धा आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाला बळकटी मिळते.शहरात विकासाचा झंझावात सुरु असतांना स्वच्छता, सुविधा व सौंदर्यीकरण या विकासाच्या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब करण्यात येत असून शेगांव प्रभागाला पुरेपूर लाभ देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला. अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक- १ शेगाव -रहाटगांव अंतर्गत कॉटन ग्रीन कॉलनी श्री भोयर ते देशमुख यांच्या घरा पर्यंत काँक्रिट नालीचे बांधकाम करणे, शेंगाव गावठाण अंतर्गत श्री. वानखडे ते श्री धंदर व श्री. रामटेके ते श्री. वानखडे यांच्या घरापर्यंत काँक्रीट नाली व श्री. बागडे ते श्री. वानखडे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे तसेच प्रभू नगर मधील उषा कॉलनी -कमल वास्तव कॉलनी येथील अंतर्गत नालीचे बांधकाम करणे अशा विकास कामांचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत व नामफलकाचे अनावरण करून भूमिपुजनाची औपचारिकता साधली. पुढे बोलतांना आमदार सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या कि, शेंगाव -रहाटगांव प्रभाग हा गेल्या १५ ते २० वर्षात मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण झाला आहे. या भागात लहान -मोठ्या अशा अनेक लोकवसाहती निर्माण झाल्यात. जुन्या शहरात राहणारे कुटुंब हे वाढत गेल्याने त्यांनी नव्या ठिकाणी जागा घेऊन आपले वास्तव उभे केले आहे. अत्यंत कष्टाने आज नवीन लोकवसाहती निर्माण झाल्या आहेत. अशा आपल्या लोकांचे जेव्हा स्वप्नांचे घर निर्माण होत असतांना त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. म्हणूनच वाढत्या शहरीकरणामध्ये सुद्धा जनविकासाची कामे मार्गी लागण्यासाठी एक नियोजनबद्ध कार्यक्रम राबविला जात असल्याचे सांगून आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी आपला ऋणानुबंध जोपासला. दरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून निवेदनांचा सुद्धा स्वीकार केला. निवडणूकपूर्व काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आल्याने आज स्थानिक भागात विकासाचे पर्व आले आहे. त्यामुळे आगामी काळातही आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनाच आमची सदैव साथ राहणार असल्याची कृतज्ञता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, रत्नदीप बागडे , प्रवीण मेश्राम, अभिषेक बोळे, ऋतुराज राऊत, डॉ. नीलिमा देशमुख, अरविंद दिघडे , प्रशांत केने, आर. मालवीय, समीर फाटेपुरे , अमोल पाटील, खरबडे, अरविंद नागपुरे , शिवाजी देशमुख, प्रभुदास फंदे, आदींसह शेगाव -गावठाण, कॉटन ग्रीन कॉलनी, प्रभू नगर ,उषा कॉलनी -कमल वास्तव कॉलनी आदी भागातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

What's your reaction?