मुर्तीजापुर नगरपरिषदेच चित्र बदललं हिंदू एकता म्हणून भाजपाचे हर्षल साबळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे मुर्तीजापुरकरांनी ठरवलं
मुर्तीजापुर – विशेष प्रतिनिधी योगेश विजयकर
उद्या मुर्तीजापुर नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या एक दिवस अगोदर एक तारखेला मूर्तिजापुरातील चित्र बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आतापर्यंत शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायकराव गुल्हाने यांच्या नावाची चर्चा होती मात्र भाजपाचे हर्षल साबळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायकराव गुल्हाने या दोघांमध्ये लढतीचे चित्र होतं, त्याचबरोबर शिंदे सेना, अजित पवार राष्ट्रवादी, भारतीय काँग्रेस या सर्व पार्टीचे उमेदवार हिंदू चेहरा असल्यामुळे या दोघांच्या मधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येण्याचे चित्र समोर येत असताना मूर्तिजापूर शहरातील चित्र आज रात्री बदलत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे हिंदू एकता म्हणून सर्व हिंदू एकत्र होऊन भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले हर्षल साबळे यांच्या नावाची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे आमदार हरीश पिंपळे यांचे निकटवर्तीय, त्याचबरोबर भाजपाने जनसामान्य कार्यकर्त्याला संधी दिल्याने भाजपाच्या पाठीशी राहण्यासाठी सर्व हिंदू एकत्र होऊन हर्षल साबळे यांच्या नावाची चर्चा सध्या मुर्तीजापुर शहरात सुरू आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीत सर्व हिंदू एकत्र येऊन हर्षल साबळे यांना संधी देणार असल्याचे चित्र सध्या मुर्तीजापुर शहराच्या गल्लीमध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आता भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा असलेला हर्षल साबळे यांना विजय प्राप्त होतो किंवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेख इमरान शेख खलील यांना विजय प्राप्त होतो याकरिता सर्व मुर्तीजापुर करांचे लक्ष लागले आहे
काय आहे मुर्तीजापुर नगरपरिषदेच चित्र?
भाजप हर्षल साबळे,वंचित बहुजन आघाडी शेख इमरान शेख खलील, शिव सेना शिंदे गट शुभम मोहोड, काॅग्रेश अशोक दुबे,शिव सेना उध्दव ठाकरे विनायकराव गुल्हाने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार कृष्णराव गावंडे, असे पाच पक्ष तर तीन अपक्ष उमेदवार आहेत या मध्ये सर्व हिंदू तर एक मुस्लिम उमेदवार असल्याने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो याचे भान ठेवत सर्व हिंदू समाजातील मतदार एकत्र येत हर्षल साबळे यांना निवडून देण्याचे ठरवल्याचे चित्र दिसत आहे




















